बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश मंडळांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई | महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 31 ऑगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव 9 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात गणपतीची स्थापना (Ganesh Sthapna) केली जाते. आज अनेक शुभ योगांमध्ये हा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

उत्सवाच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो की, या प्लास्टिकमुळं होणार प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More