वाढदिवस उद्धव ठाकरेंचा पण चर्चा होतेय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांची
मुंबई | आज 27 जुलै म्हणजे शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना त्यांचे शिवसैनिक, कार्यकर्ते आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी, नेते शुभेच्छा देत आहेत. तर राज्यभर सगळीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन फलक लावले गेले आहेत. परंतु एके काळचे निष्ठावंत शिवसैनिक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छांची सध्या चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थान….” असे शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सध्याच्या काळात शिवसेना आणि शिंदे गटात तुफान खडाजंगी सुरु आहे. शिवसेनेचे अंतरीक बंड म्हणता म्हणता प्रकरणे न्यायालयात गेली आहे. आता शिवसेना (Shivesena) आणि शिंदे गट न्यायालयात अनेक मुद्द्यांवरुन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यात 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई, शिवसेना कोणाची?, धनुष्यबाण कोणाला मिळणार आदी प्रश्न आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री संबोधले आहे. त्यात त्यांनी त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केला नाही. त्यामुळे त्यांचे हे ट्विट चर्चेत आहे. त्यांनी त्यांना पक्षप्रमुख म्हणण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना पक्षप्रमुख होण्याची सुद्धा इच्छा आहे का? अशा चर्चा सध्या शिवसेनेत सुरु आहेत.
थोडक्यात बातम्या –
“उद्धव ठाकरे दोनवेळा घरातून पळून गेले, त्यांना नारायण राणेंनी परत आणलं”
‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी
“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”
‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी
Comments are closed.