Eknath Shinde l सध्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी संजय मंडलिक यांचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांवर केली जोरदार टीका :
या सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तळपत्या सूर्याप्रमाणे महाविकास आघाडी जाळून टाकायची आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.तसेच मान गादीला आणि मत मोदीला द्या असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. तसेच संजय मंडलिक यांनी कधी कोणाला त्रास दिला आहे का? हा साधा सरळ माणूस आपल्याला दिल्लीला पाठवायचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
काँग्रेसचे उमेदवार हा मतदारसंघ सोडून पळत आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. 2014 सालानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला आहे का? असा सवाल मुख्यमंत्री एककनाथ शिंदेनी उपस्थित केला आहे. तसेच देशासाठी 24 तास काम करणारा पंतप्रधान देशाला पाहिजे की परदेशात जाऊन गार गार वारा खाणारा पाहिजे? असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला आहे. त्यामुळे 4 जूनला या काँग्रेसचा बदला घेणार आहेत ना आपण? असा सवालही त्यांनी केला आहे.
Eknath Shinde l फेसबुकवर बोलणाऱ्या व्यक्तीला मतदान करणार आहात का? :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यावेळी स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी काँग्रेसला डोक्यावर घेतलं आहे. आज आमच्या सरकारमध्ये म्हणजेच महायुतीत सर्व जाती धर्माचे मंत्री आहेत. हसन मुश्रीफ इथं मंत्री आहेत असंही ते म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तुम्ही फेसबुकवर बोलणाऱ्या व्यक्तीला मतदान करणार आहात का? तसेच मोदींनी 10 वर्षात केलेलं काम आणि 60 वर्षे काँग्रेसने देशाला खड्ड्यात घातलेला काळ एकदा पाहा असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
विरोधक एक एक वर्षाचा पंतप्रधान करायचं म्हणतात, ही काय महापालिका आहे का? अशा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लगावला आहे. कोल्हापुरात हसन मुश्रीफ, समरजित घाटगे, संजय मंडलिक असा त्रिवेनी संगम झाला आहे. त्यामुळं कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
News Title – Chief Minister Eknath Shinde strongly criticized the opposition
महत्त्वाच्या बातम्या –
नागरिकांनो घराबाहेर पडू नका; आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट
आज या राशींचे भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, बक्कळ पैसा मिळणार !
“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?
सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!
अमोल कोल्हेंचा मोठा डाव म्हणत शिवाजी आढळरावांची माघार, यापुढे कोल्हेंना उत्तर देणार नाही!