मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकला गेले.
मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगावच्या एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. त्यावर गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
एकनाथ शिंदे हे केवळ दर्शनासाठी आलेले नव्हते तर भविष्य पाहण्यासाठी देखील आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यंत्रणेला कुठलीही कल्पना नसतांना अचानक ताफा शिर्डीहून सिन्नरकडे वळविल्याने दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा सुरू झालीये.
दरम्यान, याविषयी देवस्थान आणि मुख्यमंत्री यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, देवस्थानचे विश्वस्त मात्र दर्शनासाठी आले होते, राज्यावर आलेली संकटे दूर होऊदे अशी प्रार्थना त्यांनी केल्याची माहिती देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या- महत्त्वाच्या बातम्या-