मुख्यमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार? मदतनिधीमध्ये आर्थिक घोटाळा???

मुंबई | राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

मुख्यमंत्री मदत निधीतून मदत मिळवण्यासाठी अहमदनगरच्या मृत रुग्णाच्या नावाने अर्ज करण्यात आला. प्रत्यक्षात मदत मिळण्यापूर्वीच रुग्ण मृत झाला, मात्र त्यानंतर राज्याच्या वैद्यकीय साह्य केंद्राने कोणतीही शहानिशा न करता तब्बल 90 हजार रुपये रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केले. 

धक्कादायक बाब म्हणजे हे एक अपवादात्मक उदाहरण आहे. मुख्यमंत्री मदतनिधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरु असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आलाय. एक दोन नव्हे तर तब्बल 1500 प्रकरणांमध्ये अनियमितता असल्याचं कळतंय.