बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला’; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

मुंबई |  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. दोन दिवसीय अधिवेशनात मोठ्या घडामोडी घडल्या. सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. समारोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला.

विधानसभेत झालेल्या राड्यामुळे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले बाळासाहेब थोरातही अवाक झाले. मी तर अगदीच नवखा असून कालचा संपूर्ण प्रकार पाहून उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतयं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला हाणला.

काल जे काही घडलं हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यानंतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आम्ही ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारडे माहिती देण्याची मागणी केली. यात काय गुन्हा केला? भाजप सत्तेत असताना त्यांनीही ही माहिती मागितली होती. मग जर त्या माहितीत 8 लाख चुका होत्या तर तुम्ही ती कशासाठी मागितली होती?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

“काल जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं”

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More