मुख्यमंत्र्यानी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी- अनिल देशमुख
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी जमा करण्यास सांगितले असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. यावर अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण देत परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या आरोपांवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतलं असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“आता कळलं का?,वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता”
“आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता”
“100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, गृहमंत्र्यांसोबत त्यांनीही राजीनामा द्यावा”
महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे- राज ठाकरे
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
Comments are closed.