मुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक

मुंबई | निवडणूक प्रतिज्ञापत्रात फाैजदारी गुन्हे लपल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मान गमावला आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा लवकर राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्र्याच्या या पारदर्शक कारभारावर  नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे नेहमी नैतिकतेच्या गप्पा मारतात, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, स्वत:वरील दोन गुन्हे लपवणं हा किती पारदर्शक कारभार आहे. हे यातून सिध्द झालं आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-राज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस

-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री???

-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला?

-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट