मुंबई | बंड करुन एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकार पाडलं. त्यानंतर भाजपशी संगनमत करुन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यावेळी शिंदे गटाचे सर्व आमदार गोव्यात एका पंचतारांकीत हॉटेलात होते. त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं कळताच त्यांनी मोठा जल्लोष केला. गोव्यात असलेल्या सर्व आमदारांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी नाचायला सुरुवात केली. काहींनी तर टेबलवर चढून डान्स केला.
आमदारांच्या या डान्सची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशी तंबी देत काळजी घेण्यास सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर गोव्यातील हॉटेलच्या लॉबीमध्ये जमलेल्या आमदारांनी एकच जल्लोष केला. मराठी गाण्यावरील त्यांचा डान्स व्हायरल झाल्यानंतर ही अतिशय अशोभनीय घटना असल्याची टीका केली आहे.
सर्व बंडखोर आमदारांनी यावर भाष्य केलं. अशाप्रकारे नाचणं ही चूक होती, हे आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो. नागरीकांनी निवडून दिलेल्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या आमदारांना हे शोभत नाही. आनंदाच्या भरात अशा चूका होतात, पण खरंतर त्या व्हायला नकोत, असं मत बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
थोडक्यात बातम्या –
उपमुख्यमंत्री होताच फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल
आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी
‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा
“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”
Comments are closed.