बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोडली ‘ही’ परंपरा

मुंबई | आजपासून महाराष्ट्रातील अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजीचं वातावरण आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याची परंपरा मोडली आहे.

प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद घेतली जाते पण यावेळी पत्रकार परिषदच झाली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परंपरेला छेद दिला असं म्हटलं जात आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो, तो कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मंत्रीमंडळाची बैठक बोलवली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं.

ED च्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरे समन्स मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करत आहेत. देशमुख यांच्या मुद्द्यावरून देखील विधिमंडळामध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर सरकार या मुद्यावरून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, MPSC, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी कायदे अशा विविध मागण्यांवरून हे अधिवेशन रंगण्याची शक्यता आहे. विरोधीपक्षाने या विषयांवर आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळे मागील अर्थसंकल्पिय अधिवेशानाप्रमाणे हे अधिवेशन देखील वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच- मोहन भागवत

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; सरकार मांडणार ‘हे’ 3 मुख्य प्रस्ताव

मी आणखी 25 वर्षे तरी राजकारणात राहणार- देवेंद्र फडणवीस

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More