बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ’; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे

मुंबई | थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर जेवायला येऊ, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढला आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमलं नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

स्वबळाचा अर्थ असा नका समजू. म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर उद्या जेवणावरून आघाडीत बिघाडी असं काही छापून यायचं, असं काही नाही. हा गंमतीचा भाग आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वबळावर लढण्यासंदर्भात आम्ही चर्चा करू… आमच्या पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. महाराष्ट्र काँग्रेसचं राज्य आहे. भविष्यात तुम्हाला कळेल, 2024 मध्ये काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या- 

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ मोठे निर्णय घेण्याची शक्यता

संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं- नाना पटोले

पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लश्कर ए तोयबचे तीन अतिरेकी ठार

नवाजुद्दिन सिद्दीकीचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली ‘मला वाघ मिळालाय’

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More