बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

मुंबई | लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, शनिवारी त्याचे ‘तोत्के’ चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरूपात 17 मेच्या मध्यरात्री गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. परंतू काही समुद्री हालचाली झाल्या तर हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर देखील धडकू शकतं. त्याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आहे.

अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, अशा सुचना केल्या आहेत. विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असं, उद्धव ठाकरे यांनी यंत्रणांना सांगितलं आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

दरम्यान, अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तोत्के चक्रीवादळ तयार होऊन पुढील 24 तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर-वायव्येकडे सरकणार असून, 17 मे रोजी रात्री 9 ते 12च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याचा अंदाज आहे.

थोडक्यात बातम्या-

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त, 53 हजारांपेक्षा रूग्ण परतले घरी

‘या’ राज्यात लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारने आणखी लॉकडाऊन वाढवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More