‘l love Uddhav Thackeray…’; प्रसिद्ध गायक लकी अलींची पोस्ट चर्चेत
मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. या बंडानंतर ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदाराची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सो़डला. त्यावेळी प्रचंड जनसमुदाय वर्षाच्या बाहेर पाहायला मिळाला.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनीही उद्धव ठाकरे यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर वाढला, असं ट्विट केलं होतं. यानंतर आता बाॅलिवूड इंडस्ट्रीमधूनही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला जात आहे. बाॅलिवूडचे सुप्रसिद्ध गायक लकी अली l love udhav and I love his statemanship full stop, अशी फेसबूक पोस्ट केली आहे.
दरम्यान, बुधवारी उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं वक्तव्य करत बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक लाईव्हनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. याच अनेक नेतेमंडळी, बॉलिवूडमधील अभिनेते यांचीही समावेश होता.
थोडक्यात बातम्या
राज्यातील घडामोडींवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…
‘तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा’; शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र
‘त्यांचा माज वाढलाय’; नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊत संतापले
“महाविकास आघाडी सरकार पडतंय त्याचं मला दुःख नाही फक्त…”
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने शिंदे
Comments are closed.