मुंबई | येत्या 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चिपी विमानतळाचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त उदघाटन होणार आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या विमानतळाच्या उदघाटनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही. नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र निलेश आणि नितेश सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात.
शिवसेनेचे नेतेदेखील राणेंना प्रत्युत्तर देतात. अशा परिस्थितीत ठाकरे आणि राणे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा’; माजी सनदी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र
“ज्यांचं बोट धरुन महाराष्ट्रात आले त्याच सेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न”
‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार
संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार