बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ आज सकाळी विमानाने दिल्लीला रवाना झालं आहे. तसेच महाराष्ट्र सदन येथे हे शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पोहोचेल, असं सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असतील.

दरम्यान, आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यतः मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील जीएसटी परतावा, चक्रीवादळामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीबाबत मदत तसेच महाराष्ट्रासाठी पुरवण्यात येणाऱ्या लसींसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर नेमकी काय भूमिका मांडतात आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी काय प्रतिक्रिया देतात आणि काय पावले उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

जेव्हा छगन भुजबळ फडणवीसांना फोन करून म्हणतात, ‘आम्हाला मदत करा,आम्ही…’

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांच्या खाली

जात पंचायतीचा जाच संपणार कधी?; बहिष्कार टाकल्यानं 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मुळशीतील रासायनिक कंपनीत पुन्हा एकदा आगीचा थरार; आज सकाळी पुन्हा आग भडकली

“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More