बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई | मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर चेंबूर वाशी नाका परिसरातील डोंगरालगतच्या घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने दोन दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 23 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. 

मुंबईतील पावसाचे परिस्थिती लक्षात घेता तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आज झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत तब्बल 200 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याशी होत असलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करणार? तसेच येत्या दोन दिवसांमध्ये रेड अलर्ट जारी केला असताना कोणत्या उपाययोजना केल्या जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More