बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट राज ठाकरेंना फोन, केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

मुंबई | महाराष्ट्रासह देशात देखील कोरोनाचा धोका पुन्हा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आज 49 हजारांहून वर गेल्याने सरकारने कडक निर्बंध लावले आहेत.

यामुळेच विरोधी पक्षांनी कोरोना आळा घालण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील लॉकडाऊन बाबत चर्चा केली आहे.

याबाबत, मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. ‘राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना केलं आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या कोरोनाग्रस्त आहेत. फोनद्वारे फडणवीस यांनी रश्मी ठाकरेंच्या स्वास्थ्याची चौकशी केली आहे. सध्या रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

भारताच्या ‘या’ खेळाडूची धोनीसोबत तुलना, तो म्हणतो, “धोनीसारखा कोणी नाही”

राज्यात लागू शकतो ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन; महत्त्वाची माहिती आली समोर

उद्धव ठाकरेंना फोन करून फडणवीसांनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More