मुंबई | भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला आग लागली. दुर्दैवाची बाब म्हणजे या आगीत 10 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.
ही घटना कळताच उद्धव ठाकरेंनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बाळांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2021
थोडक्यात बातम्या-
…मग त्या ‘औरंगाबाद’चं नामांतर कधी?; संजय राऊतांनी भाजपला खिंडीत गाठलं!
अत्यंत हृदयद्रावक!!! सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू
जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा झटका
रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!
‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती