बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार राज्यव्यापी कोरोना लसीकरणाचा लसीचा शुभारंभ

मुंबई | कोरोनाचा नायनाट करण्यासाठी राज्यात आज लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सकाळी 11.30 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते यो मोहिमेला शुभारंभ होणार आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता विलेपार्लेतल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आणि तिसऱ्यामध्ये 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशिव म्हणा; याकडे मी गांभीर्यानं बघत नाही”

“…म्हणून हेगडे देखील आता माझ्यावर आरोप करत असावेत”

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन!

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरु होणार- वर्षा गायकवाड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More