बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीत बिघाडी?; राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी खडाजंगी

मुंबई | महाराष्ट्रात तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं. त्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. यालाच महाविकास आघाडी असं नाव देण्यात आलं. परंतु, आता याच महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्र काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना होत असताना दिसून येत आहे.

जलसंपदा विभागाच्या कामामध्ये घाईगडबडीने निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे मत व्यक्त केलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना म्हटलं आहे की, पृथ्वीराज चव्हाणांप्रमाणेच प्रशासनाला हाताशी धरून मुख्यमंत्र्यांकडुन राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली आहे. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारामुळे यापूर्वीही सरकारवर सत्तेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. गेल्या दीड वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आहे. पण या ना त्या कारणावरून काही प्रमाणात कुरबुरी पाहायला मिळत होत्या, पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरून हटवून प्रवीण परदेशी यांना त्यांच्या जागेवर नेमणूक करायची आहे, असं बोललं जात आहे. त्यामुळे, जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरून मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याचीही चर्चा आहे. याच प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड अस्वस्थ आहेत, त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?”

ऐकावं ते नवलंच! लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी पठ्ठ्याने पळवली बस, अन्….

विनापास गोव्याला चाललेल्या पृथ्वीला पोलिसांनी पकडलं, पाहा पुढे काय घडलं!

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवणं पूनावालांना फायद्याचं की तोट्याचं?; पूनावाला म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More