बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिजीत बिचुकलेंसह 20 जणांच्या संपर्कात”

मुंबई। विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच सगळीकडे चर्चा पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी 35 समर्थक आमदारांसोबत बंड केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यात एकनाथ शिंदे आमदारांच्या मोठ्या गटासह बंड केल्याने मनसेचे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे.

सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अभिजीत बिचुकले (Abheejit Bichukle) यांच्यासह 20 जणांच्या संपर्कात आहेत, असं म्हणत गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्याला जाऊन आलं की, हे असंच होत असतं. नकली हिंदुत्वाच्या पत्यांचा बंगला आता कोसळणार, असं देखील गजानन काळे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्यात-

‘परत जाऊ नका आता’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला

“आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार, सुरतमधून सर्वात मोठी अपडेट समोर

“…त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांची भावना समजून घेऊ शकतो”

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More