बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही – नारायण राणे

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल बुधवारी सायंकाळी पार पडला. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणेंनी ‘शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही’ म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी म्हटलं की, शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या. पवार मला म्हणाले की चांगले काम करा. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मात्र मला शुभेच्छांचा फोन आला नाही.

पुढे राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो. त्याचबरोबर नारायण राणे यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.

दरम्यान, देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल, याचा मी विचार करेन, असं पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

पुण्यातील शाळा सुरू करण्यास मिळाला हिरवा कंदील; दीड वर्षानंतर होणार शाळा सुरू!

रूपाली चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

“देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे”

धक्कादायक! चोरीच्या भितीने लेकरांच्या पायात साखळी बांधून लावलं कुलूप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More