बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची भीती दाखवत…”; रवी राणांची खरमरीत टीका

अमरावती |  कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशातच आज गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. राज्यात कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सरकार तातडीने उपाययोजना राबवत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भाजप सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका आहे. बडनेरा मतदान संघाचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरी सुद्धा गणपतीचं आगमन झालं आहे. यावेळी राणा यांनी गणरायाकडे साकडे घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांना कोरोनाची भीती दाखवून घरी बसण्यास सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली उद्धव ठाकरे लोकांना दहशतीखाली ठेवत आहे, असं देखील रवी राणा म्हणाले.

मागील वर्षी गणपतीचं आगमन झालं होतं तेव्हा रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासह परिवारातील सगळ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईत तिसऱ्या लाटे साजरा केला होता. आज अमरावतीत राणा यांनी त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली.

दरम्यान, कोरोनाचं संकंट अजूनही टळलेला नाही आहे. त्यामुळे सगळ्यां लोकांनी आपापली काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून आपल्या सुरक्षितेची काळजी घ्यावी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात भाजपचं सरकार यावं ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील”

काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही- देवेंद्र फडणवीस

इंग्लंडचा रडीचा डाव! भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात पुन्हा नवा ट्विस्ट

औषधांची ड्रोनद्वारे होम डिलव्हरी करणारं देशातील ठरणार ‘हे’ पहिले राज्य!

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More