बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अखेर शिवसेनेनं कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहेत. कारण संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती पण त्यांनी ती नाकारल्याची माहिती आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पण विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचं बोललं जातंय. तसेच सरकारने राठोडांचा राजीनामा  घेतला नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा आधीच विरोधकांनी सरकारला दिलाय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना भेटणं टाळलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असे संकेत दिलेत.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

संजय राठोडांचं ठरलं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर…

…अन् बायकोने नवऱ्याला टेम्पोला बांधून एक किलोमीटर फरफटत नेलं; पाहा व्हिडिओ

“उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही, वेट अँन्ड वॉच”

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More