मुंबई | देशभरात 1 मार्च पासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस कुटुंबासह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या मातोश्रीं आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. जे. जे. रुग्णालयातले ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. त्यानंतर त्यांना लस देण्यात आली. लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.
‘कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचं काही कारण नाही. लस घेताना कळतही नाही.’ कोरोनाचा धोका परत वाढू नये, त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लस घेतल्यानंतर केलं आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. त्यामुळे आपली वेळ आल्यावर लसीकरण करुन घ्या. बाहेरचं अनावश्यक जाणं टाळा. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाईलाजाने परत कडक लॉकडाऊन करावा लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अॅपचा अॅक्सेस नाही. मात्र, लवकरच सर्वांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
There is no need for anyone to have any fear or confusion about the COVID vaccine. I have just been vaccinated & I am standing right in front of you. So, it is my humble appeal to all my citizens who are eligible for vaccination to go get it without any doubt in their minds. pic.twitter.com/NNCcooda0k
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
थोडक्यात बातम्या –
तारीख पे तारीख… एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या
…अन्यथा तुझं करिअर खराब करेल, अशी धमकी देत त्यानं बलात्कार केला!
कसला अफलातून कॅच!!! श्रीलंकन खेळाडूचा कायरन पोलार्डने घेतला खतरनाक कॅच, पाहा व्हिडिओ
‘या’ कारणानमुळे तृणमूल काँग्रेसला बसू शकतो मोठा फटका!
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लाॅकडाऊनचे संकेत, दोन दिवसात होणार मोठा निर्णय!
Comments are closed.