बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

मुंबई | देशभरात 1 एप्रिल पासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर आज गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. याआधी त्यांनी 1 मार्चला कुटुंबासह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता.

कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचं काही कारण नाही. लस घेताना कळतही नाही. कोरोनाचा धोका परत वाढू नये, त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिली लस घेतल्यानंतर केलं होतं.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता राज्यात कठोर निर्बंध लावले गेले आहे. तर दुसरीकडे राज्यात लसीकरण वाढवण्यासाठी सरकार भरपूर जोर देत आहे. कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. राज्यातील सर्व घटकांसाठी लसीकरण करण्यात यावं यासाठी सरकारने केंद्राकडे विनंती देखील केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुरूवारी कोराना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी सर्वांना पुढे येऊन लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील बुधवारी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री!

राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज!

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More