बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुन्हा दिपाली चव्हाण होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील”

मुंबई | मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवकुमार या उप वनसंरक्षकच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं दिपाली यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं. त्यानंतर बंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमारला अमरावती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यावरून राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. अशातच यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत मांडलं आहे.

महाराष्ट्र राज्यासारखी प्रशासकीय यंत्रणा देशपातळीवर नाही. मात्र अशा घटना घडणं, अतिशय वेदनादायी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालावं , अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. तर अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी जे काही करायला लागेल, ते आपण करू असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

चूक कोणाची आहे त्यात मी पडत नाही. मात्र पुरुष किंवा महिला अधिकारी कुणीही असो, त्यांना त्रास होत असेल तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपले मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा असावी, अशी एखादी यंत्रणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उभी करावी, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी अन्याय निवारण यंत्रणा उभारुन कार्यालयांमध्ये सुरक्षित आणि ताण-तणावमुक्त परीवेश देण्यासाठी सकारात्मक निर्णय विचार करावा.आपण यावर तातडीने निर्णय घ्याल, असा मला विश्वास असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! ‘राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात ‘संधींची त्सुनामी’- मुकेश अंबानी

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती- पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय’; ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही- रमेश चेन्निथला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More