बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे कशावर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संध्याकाळी 8. 30 वाजता वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. आता वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्यातील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, अशा जिल्ह्यांचाही आढावा घेतला जाणार असून त्या जिल्ह्यांसाठी काही विशेष उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान,राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सरकारने निर्बंध लावून देखील नागरिक कोरोना नियम मोडतांना दिसत आहे. राज्यात अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात आता लॉकडाऊनवजा निर्बंध; वाचा महत्त्वाची नियमावली

राज्यात अंशत: लॉकडाऊनची शक्यता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने सांगितली ‘अंदर की बात’!

पुण्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पठ्ठ्या एक लाख रूपये किलोनं विकतोय ‘ही’ भाजी; वाचा देशात कुठे होतंय उत्पादन

लग्नाच्या दीड महिन्यानंतर बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More