बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करता येणार नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी जनतेला गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरी केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा घरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

आंबेडकर जयंती हा उत्सव आणि आनंददायी क्षण आहे. डॉ बाबासाहेब यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केलं जाईल, असा विश्वास मुख्यमंत्रांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ब्रेक द चेनच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन आणि यंत्रणा सर्व सहकार्य करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, बैठकीत जयंती समन्वय समितीच्या वतीने 14 एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी हे आवाहन केलं गेलं आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारक स्थळावरून थेट प्रक्षेपण सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“…तर 2-4 आठवड्यांतच कोरोना रूग्ण कमी होतील”

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

लेखक राज ठाकरेंना म्हणाले, जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट, रूपाली पाटील म्हणाल्या, ‘तुला सोडणार नाही…’

पंजाने धनुष्यबाणाशी जुळवून घेतलं, घड्याळाचं टायमिंग चुकलं, कमळाचं गणित हुकलं!

‘…म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More