बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी वचन देतो….’; पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई | ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आक्रमर पवित्रा घेतला होता. यावरून राज्य सरकारवही टीका होत होती. मात्र यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.

एमपीएससीची पूर्व परीक्षा घेतली जाणार असून मी वचन देतो की आठवडाभरात परीक्षा होणार आहे. परीक्षेची तारीख ही उद्या जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली तयारी चालू ठेवावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परीक्षार्थाींना केलं आहे. त्यासोबतच त्यांनी वयोमर्यादेवरही स्पष्टीकरण दिलं आहे.

ज्या उमेदवाराला ही परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना वयोमर्यादेची अट आडवी येणार नाहीस असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नये, असंही आवाहनही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात वडेट्टीवारांच्या खात्याचा हात पण मंत्री म्हणतात, मला विचारलंच नाही

विजय वडेट्टीवर यांच्या खात्यानं दिला MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला!

विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे- देेवेंद्र फडणवी

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घ्या”

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More