महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; मराठा आरक्षणप्रश्नी केली ‘ही’ मागणी

मुंबई | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी, अशी मागणी मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

मराठा आरक्षण कसं अबाधित राहिल. त्यासोबत एसईबीसीचे आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यासाठी केंद्राने भूमिका घ्यावी. देशभरातील राज्यांना जे आरक्षण दिलं आहे, तेही अडचणीत येणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे.

येत्या 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने पवारांशी पाऊण तास चर्चा केली.

यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या-

सर्वोच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांना स्थगिती, शरद पवार म्हणाले…

“राम मंदिराची निर्मिती करणं हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न होतं”

राज्यातील काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा- विजय वडेट्टीवार

आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा- सुप्रिया सुळे

काहीही झालं तरी मी दिल्लीत आंदोलन करणारच- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या