Top News राजकारण

जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई | सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी या मुलाखतीचा प्रोमो ट्विटरवरून शेअर केलाय. यावेळी ट्विटरवर त्यांनी उद्या धमाका होणार असल्याचं देखील म्हटलंय.

विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका होताना दिसतेय. मुख्यमंत्री हात धुवा इतकंच सांगत असतात, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना मात्र मुख्यमंत्र्यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

“विकृत बुद्धीचे चाळे करु नका. जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला स्फुर्ती येते. तसंच आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल,” असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मुंबई- महाराष्ट्रावरही कोरोनाची टांगती तलवार, शिवसेनेचा सर्तकतेचा सल्ला

विशेष पथके नेमून तातडीने आष्टीतील बिबट्याला जेरबंद करा- धनंजय मुंडे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या