देश

रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भडकले

लखनऊ | कोरोनाने अनेकांच्या जीवनातील आर्थिक गणित बिघडले आहे. या संकटात अहोरात्र सेवा देणारे १०८ रुग्णवाहिकेची सुविधा देणारे कर्मचारी अडचणीत सापडले आहे. त्यांचे वेतन बऱ्याच दिवसांपासून झालेले नाही, त्यामुळे त्यांनी नाराज होऊन आंदोलन केले होते. गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्याची दखल घेतली. त्यांनी वेतन देण्याचे आदेश काढले आहे.

त्याचबरोबर आता कोरोना संकटात गरज असलेल्या मास्क, हातमोजे आणि अन्य संरक्षण उपकरणाचा मुबलक साठा प्रशासनाने उपलब्ध करावा, असेही मुख्यमंत्री योगींनी सांगितले आहे.

१०८ रुग्णवाहिकेची सुविधा देणाऱ्या ५० टक्के रुग्णवाहिकांचा वापर फक्त कोरोना रुग्णांसाठी आणि अन्य ५० टक्के कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यास सांगितले आहे. ज्यात एकुण १०८ ची सुविधा देणाऱ्या २२०० रुग्णवाहिका, १०२ ची सुविधा देणाऱ्या २२७० रुग्णवाहिका आणि एएलएसची सुविधा देणाऱ्या २५० रुग्णवाहिका आहेत.

भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात चालता फिरता रुग्णवाहिकेची सेवा पुरवणाऱ्या जीवीके ईएमआरआय संस्थेचे प्रवक्ते सुनील यादव म्हणाले की,जर सरकारने आम्हाला आदेश दिले तर आम्ही कोरोना सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिकेंची संख्या वाढवणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाने रेकॉर्ड मोडला, एका दिवसात मिळाले तब्बल एवढे हजार कोरोनाबाधित!

आधी बेदम मारहाण, नंतर मुंडण करून पाजलं मुत्र, राजस्थानातील संतापजनक घटना!

धक्कादायक! बायकोचा मृतदेह ड्रममध्ये भरून हायवे लगतच्या झाडीत फेकून दिला अन…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या