बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री महोदय तुम्ही फक्त पाठीशी उभं रहा बाकी मी बघतो”

औरंगाबाद | आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर संस्थानांच्या लढ्याची साक्ष देत मराठवाडा उभा आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे उपस्थित राहून ध्वजारोहन केलं आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे एकाच व्यासपिठावर होते. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी आणि दानवेंनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यापासून दानवे जोरात कामाला लागले आहेत. मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात बोलताना दानवे उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त पाठीशी उभं रहावं, बाकी गोष्टी मी बघतो असं दानवे म्हणाले. मराठवाड्यातील रेल्वेचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. राज्य सरकारने सहकार्य करावं, असं आवाहनही दानवे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात जबरदस्त शाब्दिक युद्ध यावेळी पहायला मिळालं. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव राज्य सरकारने आम्हाला पाठवावा आम्ही तात्काळ दखल घेणार आहोत, असं दानवे आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग होण्याचा अधिक धोका- ICMR

मोदी हे मोदी आहेत, त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही- संजय राऊत

“माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार”

‘लस घेतली तर ब्रेकअप करेल’, गर्लफेंडला बाॅयफ्रेंडची अजब धमकी

“महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास आम्ही…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More