Top News

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; गरजूंनी जायचं कुठं??

मुंबई |  राज्यातील सत्तपेचाच फटका गरीब आणि गरजूं लोकांना आता बसू लागलाय. राज्यात सरकारच नसल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उपचारांसाठी मदत कशी आणि कुठून मिळवायची असा प्रश्न राज्यभरातून मुंबईत आलेल्या अनेक जणांना पडला आहे.

राज्यभरातून आलेल्या गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. ‘कार्यालय बंद. चौकशी करू नये’, असा आशय असलेला कागद कक्षाच्या दारावर चिटकवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून मदतीच्या आशेनं आलेल्या अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. जवळपास ५ हजार जणांना याचा फटका बसला आहे.

मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाहेर गर्दी दिसून येत आहे. मात्र कक्षच बंद असल्यानं आता जायचं कुठं असा प्रश्न गरजूंसमोर उभा राहिला आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो गरजू मंत्रालयात येत असतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळेल, या आशेनं येणाऱ्या अनेकांना सध्या रिकाम्या हातानं परतावं लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या