बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पहिल्या टप्यात ‘या’ किल्ल्यांचा समावेश

मुंबई | महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा मोठा वारसा लाभला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या गड किल्ल्यांच्या संवर्धनाची मागणी वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. परंतू महाराष्ट्रातील गडकिल्ले ऐतिहासिक वास्तू असल्यानं त्यावर आजवर कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही. आता महाविकास आघाडीच्या सरकार किल्ले संवर्धनासाठी मोठी पावले उचलताना दिसत आहेत.

राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत आहेत. किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन करतानाच त्यांचे पावित्र्य अबाधित राखून आणि सर्वांच्या सूचनांचा विचार करूनच आराखडा तयार करायला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन आहे. या गडाच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांशी संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता हे काम करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, स्वराज्याची पहिली राजधानी राजगडवर रोपवे करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता शिवप्रेमींनी यावर नाराजी दर्शवली होती. गड किल्ल्यांवर पाणी आणि इतर सोईसुविधांची गरज आहे, त्यामुळे सरकारने प्राथमिक गरजेकडे लक्ष द्यावं, असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत”

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

पुणेकरांना दिलासा; आजपासून आणखी नियम शिथिल होणार, वाचा नव्या गाईडलाईन्स

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More