बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत’; आमदार रवी राणांची जीभ घसरली

मुंबई |  सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात कोणत्या न कोणत्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून देखील राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आता एमपीएससीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका करत असताना भाजप समर्थक आमदार रवी राणा यांची जीभ घसरली आहे.

रवी राणा आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलत होते. कोरोनाकाळात परिक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकार विरोधात संताप आहे. यावेळी त्यांनी याच मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

यावेळी रवी राणा म्हणाले की, मातोश्रीसमोर एका बेशरमाचं झाड लावलं पाहिजे. या बेशरमच्या झाडाच्या माध्यमातून  महाराष्ट्राला संदेश दिला जाईल की, कितीही ओरडलो, कितीही बोललो, कितीही वेळा मागणी केली तरी राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांवर रवी राणा यांनी केलेल्या या टीकेनंतर आता राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवी राणा यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष व्हावे पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मोठी बातमी! प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने भाजपच्या 14 नाराज पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

“तुमच्या विश्वगुरु बनण्याच्या मोहापायी जनता फकीर बनत चाललीय”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यातील धबधबे व इतर पर्यटनस्थळी जाण्यास बंदी!

‘…नाहीतर आधीच्या गृहमंत्र्यांसारखी आपली परिस्थिती होऊ शकते’; ‘या’ भाजप आमदाराचा दिलीप वळसे-पाटलांना इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More