मुंबई | महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांच्या आई तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी, पर्यावरण मंत्री तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं होतं. आता रश्मी ठाकरे यांचा अहवाल आला असून त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी वर्षा या आपल्या निवासस्थानी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात भरती होण्याऐवजी होम क्वारंटाईन होण्याचा पर्याय निवडला असल्याची माहिती नुकतीच समोर आली.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात असून मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जात आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल पत्रकारांशी बोलताना येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करू असं सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
“आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण त्यात सहभागी होईल” – नितीन राऊत
‘एटीएसने जप्त केलेली ‘ती’ व्हाेल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधील व्यक्तीची’; राष्ट्रवादीचा आरोप
“उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची, करावे तसे भरावे”
शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेला सोडचिठ्ठी
45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ‘या’ तारखेपासुन सरसकट लस मिळणार; केंद्राची मोठी घोषणा
Comments are closed.