राज्याच्या मुख्य सचिवांचा फोन टॅपिंग प्रकरणावरील अहवाल सादर, रश्मी शुक्लांवर कारवाई होणार???
मुंबई | राज्यभर फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला अडचणीत येण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग आणि गोपनीय अहवाल लीक केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांच्याबद्दलचा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवला आहे.
राज्य शासनाचा अतिशय गोपनीय अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केल्याचा संशय कुंटेंनी व्यक्त केला आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांनी माझी, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपली चूक कबूल करून त्यांनी दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. पण अहवाल परत घेण्यात आला नाही. सहानूभूती आणि सौजन्याच्या दृष्टीकोनातून प्रस्तावित कारवाईबाबत पावलं उचलण्यात आली नाहीत.
रश्मी शुक्लांनी त्यांच्या अधिकारांचा चुकीच्या पद्धतीनं वापर करून लोकांचे फोन टॅप केले. हा प्रकार गंभीर आहे. यामुळे राईट टू प्रीव्हेसीचा भंग झाला आहे. त्यामुळे सरकार शुक्ला यांच्याविरोधात कारवाई करू शकतं, असं कुंटेंनी अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. मात्र वस्तुस्थिती तशी नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मंत्री असावा तर असा! जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय
…तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा घ्यावा- नाना पटोले
‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात
…अन् पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.