बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी 14 दिवसांवर आणण्यात ठाकरे सरकारला यश

मुंबई |  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये 75 हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच 27 नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या 100 होणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिली.

मंत्रालयातून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्य सचिव बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ.प्रदीप व्यास, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल उपस्थित होते.

राज्यात सध्या 35 हजार 178 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 9 मार्चपासून आतापर्यंत 52 हजार 667 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 15 हजार 768 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांवरुन 14 दिवसांवर आणण्यास शासन आणि प्रशासनाला यश मिळाले आहे. लोकांमधील जागरुकता आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविणे शक्य झाले आहे, असं ते म्हणाले.

राज्यात टेस्टींग, ट्रेसींग आणि आयसोलेशन या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला. 9 मार्चला राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आज 72 प्रयोगशाळा कार्यान्वित असून नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील. त्यामध्ये रत्नागिरी येथे एक, आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 18 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या प्रयोगशाळा सुरु होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात एकाच दिवशी 399 बाधित; महापौरांच्या खुलाश्याने पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

रेल्वेचा गोंधळ… मुंबईत रात्री उशिरा CSMT आणि टिळक टर्मिनसवर झोप उडवणारी गर्दी

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतल्या आकडेवारीवर पृथ्वीराज चव्हाणांचं चॅलेंज, म्हणाले…

केंद्राकडून राज्याला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही- वडेट्टीवार

काँग्रेसचा हात उद्धव ठाकरेंबरोबरच… काँग्रेस सरकारबाहेर पडणार म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More