बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

मुंबई | राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.

यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.मेहता यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाच राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. या काळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते ते रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.

मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1984 च्या तुकडीचे असून आता पर्यंतच्या 36 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. 1985 मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

ट्रेंडिंग बातम्या-

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा; आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांना टोला

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येनंतर स्वरा भास्कर मोठं वक्तव्य, म्हणते…

कोरोनाचं संकट दूर कर, महाराष्ट्राचं भलं करं; अजितदादांचं पांडुरंगाला साकडं

तुकाराम मुंढेंचं वर्तन भ्रष्ट आणि असंविधानिक, नितीन गडकरींचं पीएमओला पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More