बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

नाशिक | गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना नाशिकमध्ये कोरोनानंतर दोन रोगांनी डोकं वर काढलं आहे.

कोरोनानंतर नाशिकमध्ये आता चिकनगुनिया आणि डेंगूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. नाशिक शहरात चिकनगुनियाचे तब्बल 36 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचं संकट आता कुठे काही प्रमाणात आटोक्यात येत असताना चिकनगुनिया आणि डेंग्यूचा फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक शहरात डेंग्यूचे तब्बल 65 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि घराजवळ सांडपाणी साचलेल्या नागरिकांना महानगरपालिकेने नोटीस बजावून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा या नागरिकांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक महानगरपालिकेने सध्या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यास तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नाशिकमधील डेंग्यू आणि चिकनगुनिया रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासमोर नवे आव्हान उभे टाकले आहे.

थोडक्यात बातम्या –

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या घटली

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

‘या’ कारणामुळे बंगालमध्ये आदिवासी महिलेला नग्न करून संपूर्ण गावात फिरवलं; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More