थोडी तरी लाज वाटू द्या! मुलीला अश्लील गाण्यांवर..; ‘त्या’ व्हिडिओमुळे बालकलाकार मायरा वायकुळ ट्रोल

Child Artist Myra Vaikul | झी मराठीवरच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमधील बालकलाकार मायरा वायकुळ ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहात असते. रील्स आणि फोटो पोस्ट करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. मात्र, तिच्या एका व्हिडिओमुळे नेटकरी तिला सध्या प्रचंड ट्रोल करताना दिसून येत आहेत.

मायराने पावसात एक रील शूट केलं. यावरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. डोक्यात जाणारी मुलगी, असं म्हणत नेटकऱ्यांकडून बालकलाकार मायरा वायकुळला ट्रोल केलं जातंय.

मायरा वायकुळचा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर सध्या पुष्पा 2 या सिनेमातील ‘सोसेटी’ हे गाणं प्रचंड ट्रेंड होतंय. या गाण्यावर अनेक जण रील्स बनवत आहेत. यावरच मायरा वायकुळ हिनेही रील बनवली होती. पहिल्या पावसाचा आनंद घेत मायराने ‘सोसेटी’ या गाण्यावर रील केलं.

मायराच्या या रील्सला अनेकांनी लाइक (Child Artist Myra Vaikul) केलं. पण, काही जणांना तिचा हा व्हिडिओ खूपच खटकला. मायरा कुठे गेली आहे गावी गेलीस का? पाऊस पडतोय तिकडे छान… खूप छान झालंय रील, अशा कमेंट काही जणांनी केल्या. तर, काही नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून आले.

मायरा वायकुळ नेटकऱ्यांकडून ट्रोल

वयापेक्षा मोठी झालेली मुलं किशोरवयात प्रेशरमध्ये असल्याचं फिल करतात, असं एका व्यक्तीने म्हटलं. तर, वयापेक्षा मोठी होत आहे. अभ्यासाकडे लक्ष दे… अश्या रील्स करण्यात टाईमपास करून काही होणार नाही. ही तर नखरे करण्यात पटाईत आहे, असं दुसरा एक व्यक्ती म्हणाला.

काही नेटकऱ्यांनी मायराच्या पालकांनाही (Child Artist Myra Vaikul) टार्गेट केलंय. Shamelss parents! या मुलीला अश्लील गाण्यांवर नाचायला लावतात. काय वय आणि काय धिंगाणा… लहान पोरीच्या कमाईवर खाणारे पालक… लाज वाटू द्या जरा थोडी तरी…, अशी कंमेट एका व्यक्तीने केली आहे.

News Title :  Child Artist Myra Vaikul Troll

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे पोर्शे कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट; बीडच्या राजकारणात खळबळ

चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ

थकवा, हातापायाला मुंग्या येतात?, असू शकते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता; करा ‘हा’ उपाय

“मोदी अहंकारी आहेत, ते मुस्लिमांचा द्वेष करत नाही हे त्यांनी पटवून द्यावं”