Child Health | पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. वातावरणात एक आल्हाददायक सुगंध पसरलेला असतो. चौहीकडे निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली दिसून येते. सगळीकडे सुंदर नजारे असले तरी, या दिवसांत डासांची उत्पत्ती देखील अधिक वाढते.
यामुळे मलेरिया, डेंग्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यापासून स्वतःसोबतच विशेषत: लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे लहान मुलं सहजपणे डेंग्यू सारख्या आजाराला बळी पडू शकतात.
अशावेळी पालकांनी कोणती काळजी घ्यावी, लहान मुलांचा डेंग्यूपासून (Child Health) बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्टेप्सद्वारे तुम्ही आपल्या मुलांचा डेंग्यूपासून बचाव करू शकता.
डेंग्यूपासून ‘असं’ करा आपल्या मुलांचं संरक्षण
मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला : या काळात आपल्या मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि पूर्ण पँट घालायला लावा. कुठे बाहेर जाताना मुलांना पूर्ण कपडे घाला. मुलांना लांब पँट, मोजे आणि बंद पायाचे शूज घाला.
डासांना घरात येण्यापासून रोखा : आपल्या मुलापासून डासांना (Child Health) दूर ठेवण्यासाठी, डासांना घरात प्रवेश करण्यापासून रोखणे महत्वाचे आहे. यासाठी संध्याकाळी खिडक्या आणि दरवाजे बंद करा आणि आपले घर शक्य तितके थंड ठेवा, कारण थंड तापमानामुळे डासांची क्रिया कमी होते.
डासांची पैदास रोखा : डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस डास प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे घरामध्ये किंवा आजूबाजूला डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी डासांच्या उत्पत्तीची संभाव्य ठिकाणे शोधून काढा. घराजवळ पाणी साचू देऊ नका आणि फुलांच्या कुंड्या मधील साचलेले पाणी ताबडतोब स्वच्छ करा.
मॉस्किटो रेपेलेंट्स वापरा : डास चावण्याचा (Child Health) धोका कमी करण्यासाठी उघड्या त्वचेवर रेपेलेंट्स वापरा. तुम्ही तुमच्या मुलासाठी रेपेलेंट निवडत असाल, तर ते खास मुलांसाठी बनवलेले असल्याची खात्री करा आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
News Title – Child Health in Monsoon
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…
निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शरद पवार आहेत काय?, स्वतः पवारांनी केलं मोठं भाष्य
‘लाडका भाऊ योजने’साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
“वसंत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा करा”; मनसे नेत्यांकडून मागणी