महाराष्ट्र सांगली

“टिकटाॅकवर ओळख झालेल्या महिलेकडून मुलावर बलात्कार”; वडिलांची पोलिसात तक्रार

सांगली | टिकटॉकवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार संशयित महिलेविरोधात पोक्सो काद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. ही तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगा मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

संशयित महिलेची आणि अल्पवयीन मुलाची टिकट़ॉकवर ओळख झाली. या दोघांमध्ये संवाद वाढत राहीला. याच गोष्टीचा फायदा घेत महिलेने अल्पवयीन मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांतर महिलेने मुलाला माधवनगर येथे भेटायला येण्याचा आग्रह केला.

भेटायला न आल्यास आत्महत्या करण्याचीही या महिलेने त्याला धमकी दिली. त्यानंतर मुलगा भेटायला गेल्यानंतर संशयित महिलेने मुलाचे लैंगिक शोषण केलंय.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी स्वत:ला दिली तानाजीची उपमा; म्हणाले…

“प्राण जाये पर वचन न जाये, अशी शिवसेना आहे”

“महाराष्ट्रात जे झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं, भविष्यात त्यांना सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील”

2021 सालची जनगणना ही जातनिहाय व्हावी- रामदास आठवले

…हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय- राजू शेट्टी

     

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या