बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गंभीर इशारा, म्हणाले…

जालना | देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. त्यात आता राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढलेला दिसत आहे.  त्यातच आता कोरोना नियंत्रणात असलेल्या भागात शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं होतं. आता त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे. त्यामुळे सध्या शाळा सुरू करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्यानं महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या विभागातील शाळा पहिल्या टप्यात सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. वर्ग सुरू करण्यापुर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहेत. पण लहान मुलांचं लसीकरण झालं नसल्यानं आता लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.

दरम्यान, जनता त्रस्त आहे त्यामुळे निर्बंध पूर्णतः काढून पूर्ण दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोना परिस्थिती गंभीर असलेल्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करावेत, पण कोरोना स्थिती नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात निर्बंध पुर्णपणे काढून टाकावेत, असं आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

चिंता वाढली! महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ 

शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर; पुन्हा युती होणार?, नितेश राणे म्हणतात…

17 लाखाच्या चोरीचा बनाव; घडलेला प्रकार पाहून पोलिसांनीही टेकले हात!

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 16 कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More