बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! कोरोनानंतर लहान मुलांना ‘या’ आजाराचा धोका

मुंबई | एकीकडे कोरोनामुळे सामान्य लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे कोरोनोत्तर आजार वाढल्याचं चित्र दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधित धोका लहान मुलांना होत असल्याचं सांगितलं जात होतं. यातच आता लहान मुलांच्या चिंतेत वाढ करणारा नवीन आजार समोर आला आहे.

मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमच्या रुपात संक्रमण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना संक्रमणातून बाहेर पडल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी मुलांच्या शरिरात या संक्रमणाचा शिरकाव होण्यास सुरुवात होते. मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम मुलांच्या हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम करू शकतात.

ज्यावेळी कोरोनाचा संसर्ग नष्ट होतो आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी लहान मुलांच्या शरीरात अॅण्टी बॉडी विकसित होतात, त्यावेळी मुलांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना अॅलर्जीची सुरुवात होते. मुलांच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग झाल्यास या अवयवांमध्ये सूज येत नाही. हे सिंड्रोम दुर्मिळ आहे, असं बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी  सांगितलं आहे.

दरम्यान, देशांमध्ये मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचे गंभीर परिणाम पाहायला मिळत आहे. याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट, परंतू मृतांच्या संख्येत वाढ

“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”

अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, गाड्यांची तोडफोड; पाहा व्हिडीओ

कोरोनाला रोखण्यासाठी ‘या’ आमदाराने शहरातील गल्ल्यांमध्ये फिरवला होमयज्ञ!

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More