बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; वाचा केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं आवश्यक नाही, असं देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलं आहे. सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी पालक आणि डॉक्टर यांच्या देखरेखीखाली मास्क वापरण्यास हरकत नाही. 18 वर्षे वयाखालील मुलांमध्ये कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे, असं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे.

18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे, असं सूचनेत म्हटलं आहे. तसेच लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचं या सूचनेत म्हटलं आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे. स्टेरॉइडचा उपयोग हा योग्य वेळी केला पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही, पण आम्ही काय भिकारी आहोत का?”

“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

“आपल्या मुली पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना फोनपासून दूर ठेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More