कारखान्यात वस्तू तयार होतात तशी तयार होणार मुलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सध्या जग इतक्या स्पीडनं पुढे चाललंय की कधी कोणती टेक्नॉलोजी विकसीत होईल सांगता येत नाही. माणसांशिवाय गाड्या चालू लागल्या, अनेक कामगारांची जागा मशिन आणि आधूनिक रोबोटनं घेतली. तंत्रज्ञान इतक्या वेगानं विकसीत होतंय की आता मुल जन्माला घालण्यासाठी आईच्या गर्भाची पण गरज नाही. कारखान्यात वस्तू तयार होतात तशी आता मुलं तयार होणारेत. ऐकून नवल वाटलं ना पण हो.. आता आईच्या गर्भात नाही पण मुल हे birth pod मध्ये जन्माला येणारे तेही आपल्याला हव्या त्या रंगरूपाचं. असं कुठं लेकरू जन्माला येत असतंय व्हय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हो. हे होऊ शकतं. आता गर्भधारणेचीही गरज नाही आणि प्रसृतीकळा सोसण्याचीही. पण आईच्या गर्भाशिवयात मुल जन्माला घालणारी ही birth pod म्हणजे नेमकी भानगड आहे तरी काय जाणून घेऊ.

आता मूल हे आईच्या गर्भात नाही पण कारखान्यात तयार होणार हे एखाद्या सिनेमाच्या स्टोरीसारखं वाटतं. पण हाशेम अल-घैली नावाच्या एका शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत मूल जन्माला आल्याचा दावा केलाय. घैली यांच्याबद्दल बोलायचं तर ते जर्मनीतील बर्लिनचे रहिवासी असून ते शास्त्रज्ञ आणि एक चित्रपट निर्माते पण आहेत. आईच्या गर्भाशयाशिवाय मूल जन्माला आणण्यासाठी सुरुवातीला 75 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक प्रयोगशाळेत 400 ‘बेबी पॉड्स’ बसवण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे 30 हजार बालकांचा जन्म होणार आहे, अशी माहिती इक्टोलाईफ या कंपनीने दिलीये. पण आता हे बर्थ पॉड्स म्हणजे नेमके काय ते आपण आधी बघू.. तर पुरुषाला वंध्यत्वाची समस्या असेल किंवा स्त्रीला आई बनता येत नसेल. म्हणजेच जर एखाद्या महिलेला गर्भाशय नसेल किंवा काही गंभीर आजारामुळे ते काढावे लागले असेल तर अशा महिलाही या टेक्नोलॉजीच्या मदतीने आई बनू शकतात.

या टेक्निकला आर्टिफिशियल यूटरस फॅसिलिटी असं नाव देण्यात आलंय. यासाठी सगळ्यात आधी पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे अंडे मशीनमध्ये एकत्र केले जातात. यानंतर ही मशीन स्त्रीच्या गर्भासारखी काम करते. स्त्रीच्या गर्भाप्रमाणेच या कृत्रिम गर्भामध्येही ‘अम्नीओटिक द्रवपदार्थ’ टाकला जातो. 9 महिन्यांनी हा द्रव काढल्यानंतर नवजात शिशुलापण मशीनमधून बाहेर काढले जाते.

एका अॅपला जोडलेल्या या ‘बेबी पॉड’मध्ये आधुनिक सेन्सर पण बसवण्यात आले आहेत. या अॅपद्वारे, पालकांना रिअल टाईम त्वचा, नाडी, तापमान, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन पातळी, रक्तदाब, श्वासोच्छवासाची गती, हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत आणि शरीराच्या इतर अवयवांचे निरीक्षण करता येणारे. हा कृत्रिम गर्भ इतका प्रगत असेल की सामान्य माणूस याचा विचारही करू शकत नसल्याचा दावा या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या घैली यांनी केलाय.

पालक आता त्यांच्या आवडीच्या मुलाला जन्म देऊ शकतील. थोडक्यात काय तर कृत्रिम गर्भामध्ये बाळाच्या जन्मासोबतच त्याचा त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग त्याचा केसांचा रंग, बुद्धिमत्ता, शारीरिक ताकद ठरवता येणारे. या गोष्टीवर विश्वास बसत नसला तरी भविष्यात हे होणार असल्याचा दावा इक्टोलाइफ कंपनीने केलाय. त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पण शेअर केलाय ज्याची चर्चा सध्या सगळीकडेच पाहायला मिळतीये. अनेक अडचणी दूर करून हा प्रयोग भविष्यात यशस्वी होईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-