बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालकांनो लक्ष द्या! मुलांना शाळेत पाठवण्याआधी घ्या ‘ही’ काळजी

मुंबई | आठवी ते दहावी आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आता अखेर पहिली ते सातवी इयत्तेच्या शाळा देखील सुरू होणार आहोत. तब्बल दोन वर्षांनंतर शाळेत चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. पण शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी काय खबरदारी घ्यावी लागणार यासाठी सरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे.

शाळेची घंटा वाजणार पण त्यासाठी या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तत्पूर्वी साधारण नियम काय असतील याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य समीर दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वीच्या मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या बेसिक गाईडलाईन्सचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

किडनीचे आजार, ह्रदयाचे आजार किंवा ट्रान्सप्लांट झाले असेल तर अशा विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांचे डॉक्टर त्यांना शाळेत पाठवायचं की नाही हे सांगतील आणि पालक सुद्धा तेवढीच काळजी घेतील, असंही समीर दलवाई यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुलांना शाळेत सर्वकाही नियम पाळून पाठवण्याचं आव्हान करण्यात येतंय.

लसीकरण सुरू होईल तेव्हा साईडबाय साईड लहान मुलांना लस देण्यात येईल. शाळा सुरू झाली तरी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा पालकांचा निर्णय आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत पाठवणं सक्तीचं नसल्याचंही दलवाई यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी…”, चित्रा वाघ कडाडल्या

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?, चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More